Land Demand Request
महाराष्ट्रामध्ये सातत्याने औद्योगिकरणामध्ये वाढ होत असल्याने, म.औ.वि. महामंडळाने विकसित केलेल्या औद्योगिक क्षेत्रात जागेची मागणी वाढत असून जागेची उपलब्ध्ता कमी असल्याने, उद्योजकांची जमीनीची मागणी पूर्ण होवू शकत नाही.उद्योजकांची जमीनीची मागणी पूर्ण करण्या्साठी म.औ.वि. महामंडळाने जमीन मागणी मूल्यांकन व जमीन उपलब्ध्ता मूल्यांकन धोरण (Land Demand Assessment and Land Availability Assessment Policy) जाहीर केलेले आहे.
जमीन मागणी मूल्यांकन: उद्योजकांना उद्योग विकसित करण्यासाठी भूखंडाच्या आवश्यकतेनुसार भुखंड मागणी करण्यासाठी हे पोर्टल तयार करण्यात आले आहे. उद्योजकांना आपली भूखंडाची मागणी महामंळडाकडे नोंदवता येते व त्यामुळे महामंडळास एकूण भूखंड मागणीचे मुल्यांकन (Land demand assessment) करणे शक्य होईल व त्याप्रमाणे भूखंड उपलब्ध करुन देण्याची प्रक्रिया राबवता येईल.